Posts

  श्री गजानन माहात्म्य (संक्षिप्त) २१ अध्यायी पोथी अध्याय १ ला ॥श्री गणेशाय नमः ॥ जय जयाजी गणनायका । लंबोदरा विनायका । वास तव त्रिलोका । गौरीसूता नमितो तुज ॥१॥ वाग्देवी देवी शारदे । कृपा प्रसाद लाभू दे । मतिमंदा बुद्धी दे । वरद दायिनी हो मज ॥२॥ तैसे नमन देवांगणा । कुलदेवते संतजना । स्थिर करी मन्मना । गजानन महात्म्य लिहावया ॥३॥ गजानन विजय ग्रंथ थोर । भक्तजना आवडे फार । पारायणे करिती नारीनर । समाधान चित्ता होतसे ॥४॥ परी प्रपंचाचा भार । साहूनी करिती व्यवहार । कुणी होती लाचार । सेवा न घडे हातुनी ॥५॥ हूर हूर वाटे मनी । रत व्हावे पारायणी । रमावे वाटे चिंतनी । नत मस्तक चरणी व्हावया ॥६॥ तयासाठी गजानना । वाटे दिधली प्रेरणा दुर्वांकुराची रचना । हाते करवूनी घेसी तू ॥७॥ स्तोत्र रुपी नमस्कार । पठण मात्रे चिंता दूर । अनुभविती जन साचार । प्रचिती ज्यांना येतसे ॥८॥ त्यांचीच आज्ञा म्हणून । चरित्र त्यांचे लहान । लिहावयासी कारण । निमित्त मात्र मी असे ॥९॥ मूळपोथी ओव्या फार । पारायणा लागे उशिर । तयास्तव हे सार । थोडक्यात रचियले ॥१०॥ उपासना ही त्यासाठी । नामस्मरणे देव पाठी । भक्ता तारी तो संकष...